नमस्कार, मित्रांनो संत्री ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. संत्री खाल्ल्याने तिच्यातील पोषक आवश्यक गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. तसेच संत्री मध्ये विटामिन सी चे स्त्रोत मुबलक प्रमाणात असतो. तो आपल्या त्वचेवरही फायदेशीर ठरतो. आपण संत्री पासून ज्यूस बनवू शकतो, तसेच संत्र्याची जेली बनवतो, अनेकजण संत्र्याच्या सालीचे उपयोग न करता काढून फेकून देतात. पण मित्रांनो संत्र्याच्या साली मध्ये सुद्धा आवश्यक गुणधर्म असतात. संत्रीच्या सालीपासून तुम्ही तुमचे सौंदर्य निखारू शकतात. वाटल ना नवल !
खरंच, संत्र्याची साली तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. संत्रीच्या सालीपासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात, व तुमच्या सौंदर्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात. चला, तर मग जाणून घेऊयात, की संत्रीच्या सालीपासून तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे फायदे करू शकतात ?
Table of Contents
संत्रीच्या सालीपासून तुमच्या शरीराला होणारे फायदे ?
मित्रांनो, तुम्ही संत्रीच्या सालीचे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्व आहे. तर मग ते नेमके कोणकोणते? चला तर जाणून घेऊयात !
तुमच्या चेहऱ्यावरील काळसरपणा निघण्यास मदत मिळते :
मित्रांनो, उन्हामुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे, त्याचा प्रादुर्भाव तुमच्या चेहऱ्यावर पडतो. त्यामुळे तुमचे चेहरा हा काळवंडतो. अशावेळी जर तुम्ही संत्र्याच्या सालीचा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्हाला संत्र्याची साल उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर करून घ्यायची आहे, व संत्र्याच्या सालीचे पावडर+ त्यामध्ये चिमूटभर दूध + मधाचे काही थेंब यांचे मिश्रण एकजीव करून, तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहेत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळपटपणा निघण्यास मदत मिळते.
तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा निघण्यास मदत मिळते :
हो, तुमच्या चेहऱ्यावरील मृतत्वचा निघण्यासाठी संत्राची सालीचा फार उपयोग होतो. यासाठी तुम्ही ताजी ओलसर संत्र्याची साल, तुमच्या चेहऱ्यावर रडायची आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन म्हणजेच मृतत्वचा निघण्यास मदत मिळते. तसेच तुम्ही त्यावर मध टाकून, तुमच्या चेहऱ्यावर घासल्यास, तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत मिळते.
चेहऱ्यावरील काळे डागांसाठी फायदेशीर ठरते :
मित्रांनो, किशोर वयामध्ये येताना तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, तसेच पुटकुळ्या होऊन त्याचे व्रणही राहतात. अशा वेळी जर तुम्ही संत्र्याच्या सालीचा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. त्यासाठी तुम्ही संत्रीच्या सालीपासून घरगुती फेसपॅक काही बनवू शकतात. अगदी साधा आणि सोपा आहे, त्यासाठी तुम्हाला संत्र्याची सालीची पावडर एक चमचा+ त्यामध्ये मुलतानी पावडर अर्धा चमचा+ तीन चमचे दूध+ तसेच तीन ते चार थेंब मध मिश्रण एकजीव करून, हा पॅक तुम्ही तुमच्या चेहर्यावर लावावा. हप्त्यातून तीन वेळेस तरी हा पॅक लावावे, त्यामुळे हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील फुटकुळ्या चे काळे डाग जाण्यासाठी मदत मिळेल.
गुडघ्यावर तसेच हाताच्या कोपरावर काळसर पणा आला असेल, तर ते जाण्यास मदत मिळते :
हल्ली काही जणांच्या गुडघ्यावर, तसेच हाताच्या कोपरावर काळसरपणा असतो. त्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा उपयोग करू शकतात. तसेच तुम्ही ओली संत्र्याची साल तुमच्या गुडघ्यावर तसेच हाताच्या कोपरावर रगडू शकतात. त्यामुळे त्यातील डेड स्क्रीन निघण्यास मदत मिळते. शिवाय तुम्ही संत्र्याच्या सालीची पावडर+ त्यामध्ये मध+ व दूध यांचे मिश्रण एकजीव करून, तुमच्या हाताच्या कोपरावर तसेच गुडघ्याच्या कोपऱ्यावर, तुम्ही लावून ठेवावेत. असे नियमित केल्यास, तुमच्या हातापायावरील काळसरपणा कमी होउन ते जाण्यात मदत मिळते.
तेलकट त्वचा कमी होण्यास मदत मिळते :
काहीजणांची त्वचा इतकी तेलकट असते, की त्यावर काळपटपणा, तसेच काळे डाग व पुटकुळ्या जास्त प्रमाणात होतात. अशा वेळी तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाचा तुम्हाला त्रास होतो, तुम्ही कोणताही मेकअप करतात, तो लवकर खराब होतो. अशावेळी तुम्ही निरनिराळी क्रीम वापरून, त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी उपयोग करतात. पण त्याने काही फरक पडत नाही. त्यासाठी संत्र्याची साल नैसर्गिक व घरगुती उपाय आहेत. अशा वेळी तुम्ही जर संत्र्याच्या सालीचा उपयोग केला, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. ज्यांची त्वचा तेलकट असते, त्यांना उन्हाळ्यामध्ये फार त्रास होतो.
त्यासाठी जर त्यांनी संत्र्याच्या सालीची पावडर त्यांच्या चेहऱ्याला लावले, तर फरक पडेल. त्यासाठी तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर एक चमचा+ चंदन पावडर+ चिमूटभर हळद+ मध तसेच+ दोन चमचे दूध यांचे मिश्रण एकजीव करून, तुमच्या त्वचेवर नियमित लावल्यास, तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते. शिवाय चेहऱ्यावर ही नैसर्गिक चमकदारपणा व मुलायमपणा येतो.
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते :
हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे, तसेच शरीरातील हार्मोन्स इन बॅलन्स मुळे, तुमच्या शरीरावर, तसेच केसावऱ त्याचा परिणाम होतो. काहीजणांच्या केसांमध्ये कोंडा होणे, तसेच केस गळती होणे, केस रुक्ष होणे, तुकडे पडणे, तसेच टाळूला आग होणे, फोड येणे, यासारख्या समस्या होतात. त्यांनी संत्र्याची सालीची पावडरचा वापर केला, तर त्यांना फायदे मिळतील. तसेच त्यांनी दोन चमचे संत्र्याची चालीची पावडर पाण्यामध्ये खळखळून उकळून घ्यावेत, आणि त्या पाण्याने केसांना धुवावेत. त्यामुळे केसांना चकाकी येते, तसेच कोंडा असेल, तर तो जाण्यास मदत मिळते.
तसेच त्यांनी चार ते पाच चमचे संत्र्याच्या सालीची पावडर+ त्यामध्ये कोरफड जेल+ एक नींबू+ दोन चमचे दही यांचे मिश्रण एकजीव करून, केसांना वीस ते पंचवीस मिनिटे लावून ठेवावेत, त्यानंतर तुमचे केस स्वच्छ धुवावेत. त्यामुळे तुमचे केसांना पोषण मिळते व केसांच्या मजबुतीसाठी ते फायदेशीर ठरते. हा उपाय तुम्ही हप्त्यातून एक वेळेस नियमित केले तर तुमच्या केसांना योग्य पोषण मिळते, व केसवाढी साठी चालना मिळते.
चला, तर मग मित्रांनो आज आम्ही संत्र्याच्या सालीचे पासून तुमच्या शरीरावर व आरोग्यावर कशा प्रकारे फायदे होऊ शकतात, ते सांगितलेले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, व त्यामध्ये काही तुम्हाला शंका-कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवावेत.
धन्यवाद !