नाभी मध्ये तेल टाकण्याचे फायदे

0
1407

नमस्कार, मित्रांनो आज आपण बघणार आहोत नाभी मध्ये तेल टाकण्याचे फायदे नाभी म्हणजे काय? हा प्रश्न अनेक जणांना पडतोय, तर नाभी म्हणजे बोलीभाषेत बेंबी होय. नाभी हे असे मध्यम सेंटर आहे, की ते तुमच्या सगळ्या अवयवांशी जोडलेले आहेत. नाभी हा शरीराचा मध्यम पॉइंट आहे. जर तुम्हाला शारीरिक तक्रारी असतील, तर तुम्ही नाभी मध्ये तेल टाकून त्या दूर करू शकतात, हो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. खरंच नाभी मध्ये तेल टाकल्याने, तुमच्या शरीरातील तक्रारी दूर होण्यास मदत मिळते. म्हणजेच सांधे दुखी असो, गुडघे दुखी, कंबर दुखी, असो तसेच वजन कमी करण्यासाठीही त्याचा फायदा मिळतो. किती जादुई फायदे असतात ना! नाभी मध्ये तेल टाकण्याचे, आज आपण जाणून घेणार आहोत, की नाभी मध्ये कोणत्या प्रकारचे व कसे तेल तुम्ही टाकू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, की नाभी मध्ये तेल टाकण्याचे फायदे कोणकोणते! 

नाभी मध्ये तेल टाकल्यास वजन कमी होते! 

हो, तुम्हाला जाणून नवलच वाटेल, की नाभी मध्ये तेल टाकल्यास, वजन कसे काय कमी होते! तर हो खरंच नाभी मध्ये तेल टाकल्यास, तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला, जैतून चे तेल वापरायचे आहेत. जैतून तेल म्हणजे ऑलिव्ह ऑईल होय. तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये, सात ते आठ थेंब टाकून, त्यावर तुम्ही कापसाचा बोळा ठेवू शकतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. हा उपाय तुम्हाला कमीत कमी तीन महिने तरी कंटिन्यू करायचा आहे, तरच तुम्हाला फरक दिसेल. 

वाचा  लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी उपाय

सांधेदुखीसाठी मोहरीच्या तेलाचा वापर करून बघा

भरपूर जणांना सांधेदुखीचा त्रास होतो, वयाच्या हिशोबाने तसेच वाढत्या व बदलत्या वातावरणामुळे, अनेक स्त्रियांना व पुरुषांना सांधेदुखीचा त्रास होतो. अशा वेळी जर तुम्ही मोहरीचे तेल वापरले, तर तुम्हाला त्याने अधिक फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी, मोहरीचे तेल नाभी मध्ये सहा ते सात थेंब टाकून, त्यावर कापसाचा बोळा ठेवायचा आहे. असा उपाय केल्याने, तुमच्या सांधेदुखी वर फरक पडेल व तुम्हाला आराम मिळेल. 

एरंडेल तेलाचा वापर करून बघा

खूप जणांना मूळव्याधीचा त्रास होतो. अक्षरशः शौचास बसताना, तेथे कोंब येऊन रक्त येते. अशा वेळी जर तुम्ही एरंडेल तेलाचा वापर केलाच, तर तुम्हाला फायदा होईलच. कारण एरंडेल तेलाचा वापर केल्याने, मुळव्याध, भगंदर , पोटात गॅसेस होणे, पोट साफ न होणे, ऍसिडिटी होणे, पित्त होणे, यासारख्या समस्येवर तुम्हाला त्वरित आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज नाभीमध्ये एरंडेल तेलाचे, सात ते आठ थेंब टाकायचे आहेत. त्याने तुम्हाला यासारख्या समस्येवर फरक मिळेल. 

सुंदर त्वचेसाठी बदामाच्या तेलाचा वापर करून बघा

प्रत्येकाला वाटते की, आपली त्वचा एकदम सुंदर व निरोगी असावीत. तसेच मुलायम असावी. त्यासाठी जर तुम्ही बदाम तेलाचा वापर केला, तर तुम्हाला बहुगुनी फायदे मिळतील. खरंच बदाम तेलाचा वापर केल्याने, तुमची त्वचा चमकदार होते, मुलायम होते, त्यावर काळे डाग असतील, तर ते जाण्यात मदत मिळते, शिवाय नॅचरली ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येतो. तसेच बदामाच्या तेलाचा तुमच्या केसांवरही फायदा होतो. तुमचे केस वाढण्यास मदत मिळते. शिवाय तुमच्या हाता-पायांना तडे जाऊन, भेगा पडणे, ओठ कोरडे पडणे, यासारख्या समस्येवर ही तुम्हाला आराम मिळेल. त्यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपतेवेळी, बदाम तेलाचे सात ते आठ थेंब तुमच्या बेंबी मध्ये टाकायचे आहे. त्याने तुम्हाला फरक पडेल. पण हा उपाय तुम्ही कंटिन्यू तीन महिने तरी करावा, कोणताही उपाय करताना तीन महिन्याचा अवधी हा लागतोच. 

वाचा  दोन वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा.

गायीचे तुप बेंबी मध्ये टाकल्यास, होणारे फायदे! 

भरपूर जणांची त्वचाही रुक्ष असते, अक्षरशः त्यावर तडे जातात.  कधीकधी काही  जणांच्या त्वचेवर खाज येते, अशावेळी जर तुम्ही गाईचे तूप वापरले, तर तुम्हाला फायदा होईल. हो खरंच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, गाईचे तूप बेंबीमध्ये टाकल्यास, तुमची त्वचा अगदी मुलायम व सॉफ्ट होते. तसेच चमकदार होते. गाईचे तूप बेंबीमध्ये टाकल्यास, तुमचे हाता पायाला तडे गेले असतील, तर तेही जाण्यास मदत मिळते. तुमची त्वचा अगदी लहान बाळासारखी मुलायम होऊन जाते. 

सुंदर त्वचेसाठी कडुलिंबाचे तेल बेंबी मध्ये टाका

आजकालच्या तरुण मंडळींच्या चेहऱ्यावर, पिंपल्स भरपूर प्रमाणात बघावयास मिळतात. तसेच काहीजणांची त्वचा काळवंडते, तसेच त्वचेवर डाग येणे, तसेच त्वचेची आग होणे, तसेच स्त्रियांचे हार्मोन्स बदलामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात. अशा वेळी जर तुम्ही नाभीमध्ये कडुलिंबाचे तेल टाकले, तर तुम्हाला यासारख्या समस्येवर आराम मिळेल. हा उपाय तुम्हाला सलग दोन ते तीन महिने करावयाचा आहे. तरच तुम्हाला फरक पडेल. 

खोबरेल तेल नाभीमध्ये टाका

खोबरेल तेल हे मॉइश्चरायझर चे काम करते, त्यामुळे तुमची त्वचा अगदी चमकदार होते. खोबरेल तेलाचा वापर हा पूर्वीच्या काळापासून नाभीमध्ये टाकण्यासाठी होतो व ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. पूर्वीचे लोक लहान बाळाचे पोट दुखणे असो, किंवा पोटामध्ये मुरडा येणे, किंवा त्वचा कोरडी पडणे असो, त्यावेळी नाभीमध्ये खोबरेल तेलाचा वापर करायचे खोबरेल तेलाचा वापर नाभीमध्ये टाकण्यासाठी केल्यास, तुम्हाला बहुगुणी फायदे होतात. तसेच खोबरेल तेल टाकण्यापूर्वी तुम्ही नाभीवर पाच मिनिटं तेलाने मसाज करायच आहे,  नाभीमध्ये रात्री खोबरेल तेलाचे आठ ते नऊ थेंब टाकून, त्यावर कापसाचा गोळा ठेवावे. त्याने नाभीतील सगळी घाण सकाळी हळूहळू निघून जाईल, शिवाय आपली त्वचा एकदम चमकदार तजेल व मुलायम होते. 

नाभीमध्ये अल्कोहोलचा वापर करून बघा

हो, तुम्हाला जाणून खरंच आश्चर्य वाटेल, पण खरच जर तुम्ही अल्कोहोलचा बोळा ओला करून नाभीच्या ठिकाणी लावल्यास, तुम्हाला त्याचे बहुगुनी फायदे होतात. जर तुम्हाला सर्दी-खोकला, तीव्र डोकेदुखी असेल, अशा वेळी जर तुम्ही नाभीमध्ये अल्कोहोलचे चार ते पाच थेंब टाकून तेथे कापसाचा गोळा ठेवला, तर तुमची जुनी सर्दी सुद्धा जाईल, असा फायदा त्याने होतो. 

वाचा  कांद्याच्या रस चे फायदे

नाभीमध्ये तिळाचे तेल टाका

खूप जणांना केसांच्या तक्रारी असतात, डोक्यामधील त्वचा रुक्ष पडते, केसांमध्ये डॅन्डरफ होतो, जर नाभीमध्ये तिळाचे तेल टाकले, तर त्यांच्या केसांची निगडित असलेल्या समस्यांवर आराम मिळतो. 

नाभी मध्ये तेल टाकण्याची पद्धत

वरील दिलेले तेल नाभीमध्ये टाकल्याने, तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेतच. तरी भरपूर जणांना नाभी मध्ये तेल टाकण्याची पद्धत माहिती नसते. तर नाभी मध्ये तेल टाकल्यास, तेथे पाच मिनिटे मसाज करावा लागतो. त्यानंतर थोडे तेल सोडून त्यावर तुम्ही कापसाचा गोळा ठेवावा. जेणेकरून तुमच्या कपड्यांना किंवा पोटाला  तेलाचा तेलकटपणा येणार नाही. नाभी मध्ये तेल टाकल्यास, तुमच्या शरीराला बहुगुनी फायदे मिळतात करून बघा. तसेच नाभी मध्ये तेल टाकून लगेच एक ते दोन दिवसात तुम्हाला फरक पडत नाही. हा उपाय करायचा असेल, तर तुम्हाला सलग तीन ते चार महिने करायचा आहे, तर तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नाभी मध्ये तेल टाकल्यास तुमच्या शरीराला कोणते फायदे होतात, हे सांगितले आहेतच. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. 

धन्यवाद

अनवाणी पायी चालण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here